सर्व स्वामी भक्तांना सांगण्यास आनंद वाटतो कि ,परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे असंख्य लीला करून आपल्या वाणी द्वारे भक्तांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवन सार्थ केले. म्हणून "स्वामी वाणी " ह्या app च्या द्वारे स्वामी लीलांचे आजच्या काळात आपणास उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन आपल्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न होतो आहे.कर्ते करविते स्वामीच आहेत. विश्वास आहे कि स्वामींना हि सेवा नक्की आवडेल आणि आपण सुद्धा ह्या स्वामी वाणी चा योग्य अर्थ समजावून घेऊन आपले जीवन स्वामीमय करून सर्वांगीण सार्थ कराल आणि स्वामी आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ह्याची प्रचीती घ्याल..
ह्या app मध्ये प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी एक नवीन स्वामी वाणी आणि त्याचा संदर्भ पाठविला जाईल..
धन्यवाद स्वामी !